औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन 17 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 373 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना चाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 17 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 373 झाली आहे. यातील 11 जणांचे मृत्यू झाले असुन 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये 10 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या 17 ऋग्णापैकी पुंडलिक नगर (5), हमालवाडी (4), कटकट गेट (3) रेल्वे स्टेशन (1) जयभीम नगर (2) कीलेअर्क (2) या परीसरातील आहेत.
शहरात दररोज २० पेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्यामुळे दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.