औरंगाबादमध्ये बहिणीचे दागिने चोरणाऱ्या सख्ख्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सख्ख्या बहिणीचे चोरलेले चार तोळ्यांचे दागिने वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याच्या पुण्यात राहणाऱ्या मित्राच्या घरातून जप्त केले. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या समशेर खान मैनुद्दीनखान यांच्या पत्नीचे चार तोळ्यांचे दागिने २५ जानेवारी रोजी चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी २९ जानेवारी रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या चोरीचा तपास सुरू असताना समशेरखान याचा साला नरुल हसन मुस्तफाखान (२३) याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले.

त्याला खाक्या दाखवून विचापूस केली. अखेर त्याने तोंड उघडले. चोरीची कबुली दिली होती. तसेच पोलिस कोठडीदरम्यान नरुल हसन याने पोलिसांना बहिणीचे चोरलेले दागिने पुण्यात राहणाऱ्या मित्राच्या घरी ठेवल्याचे सांगितले होते. यावरून पोलिसांनी पुणे येथून सदरील चोरीचे दागिन जप्त केले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विठ्ठल चासकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

आरोपी नरुल हसन हा समशेरखान यांच्या पत्नीचा सख्खाभाऊ असून गेल्या सहा-सात वर्षांपासून तो त्यांच्याकडे राहायला होता. महिनाभरापूर्वी समशेरखान यांच्या पत्नीने त्यांचा साडेसत्तावीस ग्रॅमचा सोन्याचा हार, पावणे नऊ ग्रॅमचे झुमके तसेच पाच ग्रॅम वजनाची अंगठी एका डब्ब्यात भरून तो डब्बा कपाटामध्ये ठेवला होता. हे नरुल हसन याला माहीत असल्याने त्याने संधी साधून कपाटातील दागिने चोरले व त्याने सदरील दागिने आईचे असल्याचे सांगून ते पुण्यात राहणाऱ्या मित्राकडे ठेवले होते असे पोलिसांनी सांगितले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.