औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

0
45
dcc election
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत 7 पैकी 6 उमेदवारांनी विजय मिळवत विरोधी पॅनलच्या उमेदवारांना धूळ चारली. विरोधी पॅनलमधील फक्त कृष्णा डोणगावकर हे गंगापूर मतदारसंघातून विजयी झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे.

शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार

सोयगाव ता. सोसायटीमधून 22 मतांनी सुरेखा काळे विजयी झाले. कन्नड येथून मनोज राठोड 60 मतांनी विजयी. सिल्लोड येथून 63 मतांनी अर्जून गाढे विजयी. फुलंब्री मतदारसंघातून सुहास शिरसाठ 36 मतांनी विजयी.

औरंगाबाद तालुका मतदारसंघातील जावेद पटेल 39 मतांनी विजयी. शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातील मंत्री अब्दुल सत्तार 33 मतांनी विजयी. वैजापूर मतदारसंघातील अप्पासाहेब पाटील 68 मतांनी विजयी झाले. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here