औरंगाबाद | हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा या सणानिमित्त औरंगाबादमध्ये अनेक वर्षांपासून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच गुढ्या उभारून सण साजरा करा, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यात अंशत लॉकडाऊन पाळला जात आहे. त्या अनुषंगाने यावर्षी सर्वांनी घरीच गुढ्या उभारून सण साजरा करण्याचे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याशी चर्चा करून व विनंतीनुसार सर्व आयोजित कार्यक्रम रद्द केल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट लवकरच दूर व्हावे, सर्वांना नवीन वर्ष आरोग्यादायी होवो, आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देत घरीच राहून उत्सव साजरे करा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou