‘फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल: आठवले यांचा ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मध्यन्तरी कोरोना लसीच्या तुटवड्यावरून भाजपसह अनेक पक्षातील नेत्यांनी ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत टीका केली,. कुणी टोला मारला तर कुणी भविष्यवाणीच केली. यामध्ये केंद्रातील नेत्यांनीही टीका केली. आता राज्यमंत्री आठवले यांनीही ठाकरे सरकारला टोला लगावला. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असेल तोपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल. ज्या दिवशी फडणवीस ठरवेल त्यादिवशी हे सरकार पडेल, अशा शब्दात केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्यादरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही काळ थांबले होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना त्यांनी हे विधान केले. यावेळी आठवले म्हणाले की, हे ‘ठाकरे’ सरकार अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न आहे. हे राज्य सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत चालेल. तसेच सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे .

महाराष्ट्रात लसीचा तुटवड्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. कोरोना लसीकरणा वरुन राज्य सरकार ने राजकारण करू नये तर योग्य नियोजन करून लसीकरण सुलभ करावे. महाराष्ट्राला केंद्र सरकार ने यापूर्वीच १ कोटी ६ लाख कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.त्यातील ५ लाख लसी महाराष्ट्र सरकारने वाया घालविल्या त्यास जबाबदार कोण ? असा सवाल करीत राज्य सरकार ने केंद्र सरकार वर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्राला लागेल तेवढी लस केंद्र सरकार देणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

You might also like