औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 4,तर ग्रामीण भागातील 24 रुग्णांचा समावेश असून 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 233 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 452 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 24 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये शहरातील 3 आणि ग्रामीण मधील 21 रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद शहरातील उल्कानगरी 1, उस्मानपुरा 1, आणि इतर 2 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागातील औरंगाबाद 1,फुलंब्री 1, कन्नड 1,वैजापूर 7,सिल्लोड 2, पैठण 12 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर कायगाव येथील 27 वर्षीय एका तरुणाचा आणि 48 वर्षीय पुरुषाचा विष्णूनगर येथे मृत्यू झाला आहे.