औरंगाबाद : शहरात 2 आणि ग्रामीण मध्ये 11 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 2, तर ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 623 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 867 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3 हजार 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 21 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये शहरातील 5 आणि ग्रामीण मधील 16 रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद शहरात 2 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात गंगापूर 4, सिल्लोड 1, वैजापूर 3 आणि पैठण येथे 3 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर ककाल एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Comment