औरंगाबाद प्रतिनिधी | समतानगर येथे कोरोणाचे रुग्ण सापडल्यानंतर तेथील ८० पेक्षा अधिक नागरिकांना समाज कल्याणच्या वसतिगृहातिल अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी आणण्यात आले आहे. परंतु प्रशासनातर्फे त्यांची कोणतीच सोय करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सकाळपासून त्यांना जेवन नसून पिण्याचे पाण्याची सोय सुद्धा नाही. ते होस्टेल प्रांगणातच बसलेले असल्याचे दिसून आले आहे. यावर स्थानिक नगरसेवक अशफाक कुरेशी यांनी प्रशासनावर टीका केली आहे. नागरिकांचे स्वाग घेण्यासाठी मनपाकडे टेस्टींग किट नसल्याचा आरोप कुरेशी यांनी केला आहे.
कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. औरंगाबादच्या संपर्कात आलेल्या लोकांना 14 दिवसांसाठी अलगीकरण कक्षात ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. यासाठी अलगीकरण कक्ष हे तयार करून ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तरीसुद्धा शहरातील समाज कल्याण येथील अलगीकरण कक्षात अशी कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही. डाॅक्टरांशी संपर्क साधला असता आम्ही त्यांना इथेच क्वारंटाइन करणार आहोत अशी माहिती मिळाली तर अधिकार्यांकडून किट आॅन द वे असून त्यांचे स्वाग चाचणी घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करणार असल्याचे सांगितले गेले असे कुरेशी म्हणाले.
समता नगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जवळपास ऐंशी लोकांना आणण्यात आले होते आणि त्यांना स्वागचा नमुना घेऊन घरी पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु सकाळपासून त्यांना जेवण आणि पाणीची व्यवस्था नाही अशी तक्रार करत आहेत. समतानगर येथील नागरिकांना कालपासून आणण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्यात आली नसून त्यांचे स्वाग चे नमुने घेण्यासाठी मनपाकडे टेस्ट किट नाहीत अशी तक्रार नगरसेवक अशफाक कुरेशी यांनी केली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/258286011984406/