कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं नामांतर संभीजीनगर होणारचं- संजय राऊत

मुंबई । महाविकासआघाडीत पुन्हा कुरबुरी सुरु होण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेस पक्षाकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाम आणि सूचक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत हे बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारलं असता राऊत यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलयं.

यापूर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार या नेत्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेविरोधात उघडपणे भूमिका घेतली होती. त्यावरुन मध्यंतरी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून काँग्रेस नेत्यांना चिमटेही काढण्यात आले होते. मुस्लीम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका राऊतांनी केली होती.

घटना सेक्युलर आहे. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा हिंदूंचा छळ केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्या? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला होता. औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like