हिंगणघाटची पुनरावृत्ती औरंगाबादेतही! शरीर सुखाला नकार दिल्याने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । हिंगणघाटमध्ये घडलेल्या प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शरीरसुखाचा नकार दिल्याने एका नराधमाने त्या महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावात घडली आहे. या घटनेत महिला ९५ टक्के झाली असून त्या महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. संतोष मोहिते असे नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की काल रात्री औरंगाबाद प्रतिनिधी । हिंगणघाटमध्ये घडलेल्या प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शरीरसुखाचा नकार दिल्याने एका नराधमाने त्या महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावात घडली आहे. या घटनेत महिला ९५ टक्के झाली असून त्या महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. संतोष मोहिते असे नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आरोपी संतोष हा पीडित महिलेच्या घरात आला व त्याने पीडित महिलेला शरीरसुखाची मागणी केली मात्र महिलेने नकार दिल्याने संतोषचा पारा चढला त्याने घरातील रॉकेल पीडितेच्या अंगावर ओतून तिला जिवंत जाळले. या महिलेचा हंबरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या पीडितेच्या जावयाने घराकडे धाव घेतली.

त्यावेळी पीडिता भाजत होती व शेजारी आरोपी संतोष हा उभा होता. या महिलेच्या जावयाला पाहून आरोपी संतोष तेथून पसार झाला. कसाबसा स्वतःला सावरत शेजारी राहणाऱ्या जावयाने आग विझवली व या महिलेला शीताफीने रुग्णालयात हलविले.पोलिसांनी आरोपी संतोषला अटक केली आहे.
वाजेच्या सुमारास आरोपी संतोष हा पीडित महिलेच्या घरात आला व त्याने पीडित महिलेला शरीरसुखाची मागणी केली मात्र महिलेने नकार दिल्याने संतोषचा पारा चढला त्याने घरातील रॉकेल पीडितेच्या अंगावर ओतून तिला जिवंत जाळले. या महिलेचा हंबरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या पीडितेच्या जावयाने घराकडे धाव घेतली.

त्यावेळी पीडिता भाजत होती व शेजारी आरोपी संतोष हा उभा होता. या महिलेच्या जावयाला पाहून आरोपी संतोष तेथून पसार झाला. कसाबसा स्वतःला सावरत शेजारी राहणाऱ्या जावयाने आग विझवली व या महिलेला शीताफीने रुग्णालयात हलविले.पोलिसांनी आरोपी संतोषला अटक केली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment