औरंगाबाद प्रतिनिधी | शहराजवळील नारेगाव परिसरात एका प्लास्टिकच्या गोडाऊनला आज दुपारी आग लागली. याआधीच्या धुराचे लोट इतके मोठे होते की आकाश काळेभोर दिसत होते. या आगीत गोडाऊन मध्ये असलेले प्लास्टिक जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नारेगाव परिसरात भंगाराच्या गोडाऊनला आग लागली लोक असल्यामुळे हे भंगाराचे गोडाऊन बंद होते. भर दुपारी अचानक या गोडावूनमधून धुराचे लोट आकाशात झेप घेत असताना लोकांना दिसून आले याची माहिती ती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. ही माहिती कळताच अग्निशमन विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेऊन चार बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात अग्निशमन विभागाला यश आले
यावेळी बघ्यांची गर्दी जास्त होत असल्याने पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागली. या आगीत भंगारचा गोडाऊन मध्ये असलेले प्लास्टिक जळून खाक झाले प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागल्यामुळे धुराचे काळेभोर लोट आकाशाकडे झेप घेत होते. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले नसते तर परिसरातील दुसरे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी आले असते. परिसरातील नागरिकांनी आजूबाजूच्या गोडाऊनला आग लागू नये यासाठी प्रयत्न केले. शेवटी अग्निशमन विभाग आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आले. या आगीत जवळपास पाच लाखाचे नुकसान झाल्याची माहिती ती गोडावून मालकाने दिली.