औरंगाबादकरांना भर उन्हाळ्यात ‘लोडशेडिंग’चा शॉक

औरंगाबाद – औरंगाबाद शहराला तब्बल 3 वर्षानंतर उन्हाळ्यात पुन्हा एकदा भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील वीज बिलाची थकबाकी व वीज वितरण हानी अधिक आहे. अशा 22 फिडरवर मंगळवारी सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान महावितरणने भारनियमन केले. ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी तातडीने भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काही दिवस भारनियमन अपरिहार्य आहे, असे महावितरणने स्पष्ट केले.

विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल साधण्यासाठी तसेच विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळात भार व्यवस्थापन करण्यासाठी शहरात भारनियमन करण्यात आले. महावितरणने वितरण व मानसिक वाढ आणि नुसार वीज वाहिन्यांचे ए, बी, सी, डी, इ, एफ, जी-1, जी-2, व जी-3 तयार केले आहेत. शहरात 150 पीटर आहेत. काल सकाळी ई ते जी-3 या वीजबिलांची अधिक थकबाकीच्या 22 फिडरवर भारनियमन केले.

या भागात लोडशेडींग-
11 के.व्ही. मोंढा फिडर, 11 के.व्ही. रोशनगेट फिडर, 11 के.व्ही. गणेश कॉलनी फीडर, 11 के.व्ही. रंगीनगेट फीडर, 11 के.व्ही. निजामोद्दीन फिडर यासह 22 फिडरवर भारनियमन करण्यात आले. एका फिडरवर 1200 ते 1500 वीजग्राहक असतात त्यानुसार किमान 26 हजार वीज ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसला आहे.