औरंगाबाद – औरंगाबाद शहर व जिल्ह्यात दिवसागणिक महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. अशातच जिल्ह्यातील दौलताबाद येथील एका रक्षकानेच नराधम होण्याचे काम केले आहे. सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेल्या युवकाने आपल्याच मेहुनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. मुंबईच्या साकीनाका येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच सीआरपीएफ जवानाकडून असे कृत्य समोर आल्याने लोकांचा संताप अनावर होत आहे. यामुळे रक्षकच भक्षक बनल्याची भावना व्यक्त केल्या जात आहेत.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, सीआरपीएफ मध्ये नोकरीवर असलेल्या गणेश गिरी हा २०१७ मध्ये मुंबई येथे राहत होता. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील गणेशची मेहुणी काही कामा निमित्त मुंबई येथे आपल्या बहिणीकडे गेली होती. गणेशने मेहुणी समोर आपल्या पत्नीला मारहाण केली व पत्नी समोर मेहुणीला म्हणाला की तू जर मला शारीरिक संबंध करू दिले नाही तर तुझ्या बहिणीला मारुन टाकीन असे म्हणून बहिणी समोर शारीरिक संबंध केले याच दरम्यान गणेशने मेहुणी व पत्नी या दोघांना कळू न देता व्हिडिओ चित्रिकरण केले बनवलेला व्हिडिओ लोकांच्या मोबाईलवर टाकून देण्याची धमकी देत तीन दिवस शारीरिक संबंध केले. काही दिवसानंतर पीड़ित महिला गल्लेबोरगाव गावाकडे परतली गणेश गिरिने २०१९ पर्यंत मेहुणीला मुंबई येथे वारंवार बोलावून ७ ते ८ वेळा अत्याचार केला.
यानंतर गणेशने मेहुणीला ऑगस्ट २०२१ या महिन्यात फोन करून तीन लाख रुपये दे नाहीतर तुझे अश्लील व्हिडिओ लोकांना पाठवून तुझी बदनामी करतो, अशी धमकी दिली व दि. ३१ ऑगस्ट २०२९ रोजी जयश्री पुरी या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्या अकाउंटवर आपल्या मेहुणीचे काढलेली अश्लील व्हिडिओ क्लीप व फोटोचे स्क्रीनशॉट टाकले. ते स्क्रीनशॉट महिलेने प्रिंट काढून पीडित महिला खुलताबाद पोलिस ठाण्यात हजर झाली व बलात्कारी मेहुण्याच्या विरोधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून गणेश बबन गिरी याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखला करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक निकाळजे, पोलीस नाईक यतीन कुलकर्णी करीत आहेत.