औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे. आज शहरात फक्त चार ठिकाणी लसीकरण होणार आहे. महापालिकेकडे कोविशिल्ड लसींच्या फक्त 602 असून कोव्हॅक्सीन लसींचा 2200 डोसचा साठा उपलब्ध आहे. रविवारी उशिरापर्यंत शासनाकडून लसींचा नवीन साठा उपलब्ध झालेला नाही.
क्रांती चौक, राज नगर आणि एमआयटी हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर 200 लसी उपलब्ध राहणार असून प्रोझोन मॉल मध्ये ड्राइव्ह इन लसीकरण सुरूच राहणार आहे. या ठिकाणी 300 कोविशिल्ड लस दिली जाणार आहे.
शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी 80 केंद्रावर लसीकरण सुरू होते. परंतु आता लसीकरण केंद्राची संख्या 4 वर आलेली आहे.