धक्कादायक! औरंगाबादमध्ये घरात घुसून महिलेवर अत्याचार; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील मुकुंदवाडी परिसरात राहत असलेल्या ३५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुकुंदवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून अत्याचार करणाऱ्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुरेश गिरी राहणार मुकुंदवाडी परिसर असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला विवाहित असून रात्री ती घरी एकटीच होती. त्यावेळी तिच्या घराजवळ राहणाऱ्या ज्ञानेश्वर गिरी याने तुझ्या आईचा फोन आला असल्याचे सांगत पीडितेच्या घरात प्रवेश केला आणि तू मला खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे सांगितले.

त्यावेळी पीडितेने मी विवाहित असल्याचे सांगितल्यावर ज्ञानेश्वर गिरी याने तिला मारहाण करीत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली आणि निघून गेला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर गिरी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळोंखे करीत आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.