घोर कलियुग! ३ महिन्यांत ३ लग्न करत दागिने लुटून तरुणी पसार

0
46
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । लॉकडाउन काळात बेरोजगार झाल्याने एका विवाहित तरुणीने पैसे कमवण्यासाठी एक चांगलाच फंडा अजमवला. या तरुणीने तीन महिन्यांत तीन लग्न करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा केला आहे. लॉकडाउनच्या काळात ती आणि तिचा पती बेरोजगार झाला होता. त्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नाशिकच्या एका तरुणामुळे त्यांचा भंडाफोड झाला आणि दोघायी नवरा-बायकोला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विवाहित तरुणीने आपल्या मागील तीन महिन्यांत तीन जणांनी लग्न केली. मात्र, त्यांच्याकडील दागिने लुटून महिला पसार झाली. विजया असे या तरुणीचे नाव असून, ती औरंगाबादमधील मुकुंदवाडी परिसरात राहते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात तिचा आणि तिच्या पतीचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे त्यांनी हा गैरमार्ग अवलंबला.

असा झाला भांडाफोड
नाशिक जिल्ह्यातील एका तरुणामुळे या रॅकेटचा भंडाफोड झाला. आपल्या पत्नीचा शोध घेत असताना, तिने नुकतेच अन्य एका तरुणाशी लग्न केल्याचे त्याला समजले. या तरुणाकडे ती जवळपास पंधरा दिवस राहिली. त्यानंतर ती पळून गेली. तिने नंतर रायगडमधील कर्जत तालुक्यातील संदीप नावाच्या तरुणाशी लग्न केले. त्यानंतर तिने पश्चिम महाराष्ट्रातील एका तरुणाशी लग्न केले. हे तिचे तिसरे लग्न होते. लग्नासाठी मुलींच्या शोधात असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढून लग्न करायचे आणि त्यांना लुटण्याचे काम हे करत होते. या रॅकेटमध्ये तरुणी आणि तिचा पती सामील झाला होता. लग्न ठरल्यानंतर ते लग्नासाठी झालेला खर्च आणि लग्नानंतर काही दिवसांतच ते पतीचे दागिने घेऊन पसार व्हायचे, अशी माहिती उघडकीस आली आहे.

हाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here