औरंगाबादकरांचे दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न पुर्ण होण्यास लागणार ‘इतका’ वेळ 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरवासीयांचे दररोज पाणीपुरवठा चे स्वप्न पूर्ण होण्यास किमान तीन वर्ष लागणार असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एमसीईडीच्या कार्यक्रमात शिवसेना, भाजप आणि एमआयएममध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून जुगलबंदी झाल्यानंतर काल दुपारी पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई म्हणाले, योजना प्रगतीपथावर आहे. काही त्रुटी, शंका, प्रश्न योजनेबाबत असतील तर काही फरक पडत नाही. जलवाहिनी भूसंपादन प्रकरणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची देखील भेट घेतली आहे. त्यांनी सकारात्मक भूमिकाही घेतली आहे. औरंगाबादकरांच्या पाणीपुरवठाच्या अनुषंगाने 100 टक्के समाधान होण्यास तीन वर्षे लागतील पाइप निर्मितीला विलंब होणार असला तरी दीड वर्षाच्या मुदतीत काम करावे लागेल. तसेच सफारी पार्कच्या कामासाठी जानेवारी 2022 मध्ये निविदा निघतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment