मोठी बातमी! औरंगाबाद जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिलदरम्यान संपूर्ण लाॅकडाउन;जिल्हाधिकारी यांचा आदेश

औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाॅझिटीव्ह रूणांसोबत मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार पावले उचलली असून शहरात 30 मार्च ते 8 एप्रिल कडक लाॅकडाऊनचे आदेश काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले आहे.

या दिवसात सर्व व्यवहार संपूर्णपणे बंद राहतील, असेही प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर आणि इतर तालुक्यांतसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यात कोरोनाला थोपवण्यात यश येत नाही.

सध्याची परिस्थिती पाहता येथील प्रशासनाने आता औरंगाबादमध्ये लॉकडाऊन लागू केला आहे. 30 मार्च ते येत्या 8 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. या दिवसात कडक लॉकडाऊन डाऊन असल्याने व्यवहारही बंद ठेवण्यात येणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like