हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (david warner) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावले आहे. या द्विशतकाबरोबर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वॉर्नरने (david warner) 254 चेंडूत 200 धावा केल्या. यामध्ये 16 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. 200 धावा केल्यानंतर वॉर्नर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून माघारी परतला. वॉर्नरचं हे दुसरं द्विशतक असून याअगोदर त्याने एक त्रिशतकसुद्धा केले आहे. विशेष म्हणजे कसोटी कारकिर्दीतील वॉर्नरचा (david warner) हा 100 वा सामना आहे.
100 व्या कसोटीत द्विशतक करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन तर जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे. वॉर्नरच्या आधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने केला होता. वॉर्नरशिवाय (david warner) ऑस्ट्रेलियाकडून 100 व्या कसोटीत शतक फक्त रिकी पाँटिंगने केलं आहे. फक्त कसोटीतच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही 100 व्या सामन्यात वॉर्नरने शतक केले होते. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. या अगोदर अशी कामगिरी वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजने केली होती.
तसेच 25 कसोटी शतके करणारा तो (david warner) पाचवा सलामीवीर बनला आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर हे असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत 33 शतके झळकावली. त्यांच्यानंतर इंग्लंडचा अॅलिस्टर कूक (31), ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन (30) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्मिथ (27) यांचा नंबर लागतो.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..