ऑस्ट्रेलियातील आगीत एका कुटुंबाने वाचवले तब्बल ९० हजार प्राण्यांचे जीव

टीम हॅलो महाराष्ट्र। ऑस्ट्रेलियातील भयानक आगीत येथील वन्यप्राणांवर बेतलेल्या संकटाची मन पिळवटून टाकणारी छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. कांगारूचे बेट अशी ओळख असणाऱ्या ऑस्ट्रेलिया बेटावर असंख्य कांगारू आगीच्या विळख्यात सापडून मृत्युमुखी पडले. जगातील कोआला प्रजाती केवळ ऑस्ट्रेलियात पाहायला मिळते. गोंडस आणि निरागस दिसणाऱ्या जीवांचे या आगीत झालेले हाल आपल्याला या आगीची भयावहता काय असेल याची कल्पना करून देतात. मात्र,अशा बिकट संकटात काही माणसांनी आगीत सापडलेल्या तब्बल ९० हजार वन्यप्राण्यांना जीव धोक्यात घालून जीवनदान दिलं.

या प्राण्यांना जीव वाचवणारी ही माणसं आहेत स्टीव्ह आयर्विन यांच्या कुटूंबातील. स्टीव्ह हे एक वन्यजीव तज्ञ आहेत. स्टीव्ह यांच्याप्रमाणेच त्यांच्या कुटूंबातील सर्वानी वन्य प्राण्यांसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे. त्यांच्या याच वन्यप्राण्यांविषयीच्या प्रेमाचा प्रत्यय आला तो ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत. या भयानक आगीत जेव्हा हे वन्यप्राणी जिवाच्या आकांताने आपला जीव वाचवाण्याचा प्रयन्त करत होते त्यावेळी स्टीव्ह यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले. या आगीत स्टीव्ह यांच्या कुटुंबाने एक नव्हे दोन नव्हे तर तर तब्बल ९० हजार प्राण्यांना वाचवलं. त्यांनी वाचाविलेल्या प्राण्यांचा आकडा हा खरंच विस्मयीत आणि त्यांच्याप्रती सन्मान जागवणारा आहे.

स्टीव्ह आयर्विन हे ऑस्ट्रेलियाचे वन्यजीव जाणकार आणि प्राणिसंग्रहालयाचे मुख्य होते. पूर्वी डिस्कव्हरीवर मगरींबद्दल माहिती देणारा एक तज्ञ दाखवला जायचा. तेच हे स्टीव्ह आयर्विन. त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय हा मगर असल्या कारणाने त्यांना ‘दि क्रोकोडाइल हंटर’ नाव मिळालं होतं. २००६ साली विषारी स्टिंगरे माशामुळे त्यांचा जीव गेला. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या प्राणीप्रेमाची परंपरा त्यांच्या कुटुंबाने चालवली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अनेक प्राण्यांना वाचवलं. सध्याच्या आणीबाणीच्या काळात देखील ते दिवसरात्र काम करत आहेत. नुकतंच त्यांनी प्लॅटिपस प्राण्याला वाचवलं. हा त्यांनी वाचवलेला ९० हजार वा प्राणी होता.