वैजापूर- गंगापूर रोडवर कार व ट्रॅव्हलचा भीषण अपघात; एक ठार

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर मार्गावर महालगाव जवळील शेताजवळ गट नं.198 दौलतराव शेळके यांच्या वस्तीजवळ कार व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. यात कारचालक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. विलास दिनकर पुंड (रा.वाळूज) असे मृत कारचालकाचे नाव आहे. जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-वैजापूर रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या … Read more

धक्कादायक! झोपलेल्या पतीला फरपटत नेत पत्नीसमोरच चिरला गळा

औरंगाबाद – पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले व धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. कैलास … Read more

शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी महापालिकेची दिरंगाई

railway shivajinagar

औरंगाबाद – शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी महापालिकेची दिरंगाई सुरूच आहे. भूसंपादनाचा सुधारीत प्रस्ताव देण्यात यावा, असे पत्र भूसंपादन अधिकाऱ्याने दोन वेळा दिले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादनासाठी एक कोटी 81 लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा केला आहे. हा … Read more

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर तब्बल 37 लाखांचा गुटखा जप्त

औरंगाबाद – चोरटी विक्री करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या गुटख्यासह तब्बल 52 लाख 15 हजार 200 रुपयांचा ऐवज फर्दापूर पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. ही कारवाई 6 मे रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान जळगाव – औरंगाबाद रस्त्यावर कन्हैया कुंज हॉटेलजवळ केली. याप्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे यांना सदर रस्त्याने अवैध रित्या गुटखा विक्रीसाठी जात … Read more

विशेष रेल्वेच्या यादीतून ‘पर्यटन राजधानी’ गायब; दमरेचे दुर्लक्ष

railway

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून राज्याची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन … Read more

पंजाबमधून ऑनलाईन तलवारी मागवणारा आणखी एक जण अटकेत

औरंगाबाद – ऑनलाईन कुरिअरने पंजाब येथून तलवारीचा साठा मागितल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. त्याला आजपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस. डी. कुर्हेकर यांनी दिले. अफरोज पठाण बाबु पठाण (22, रा. भाग्यनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून पंजाब राज्यातील जालिंधर आणि अमृतसर या शहरातून मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा … Read more

Zomato Share : आतापर्यंतच्या उच्चांकावरून 65% घसरण्याचे कारण काय? गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला

Zomato Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zomato Share शुक्रवारी NSE वर 57.65 रुपयांवर पोहोचले. झोमॅटोच्या शेअर्सची हि नीचांकी पातळी समजली जात आहे. Zomato चा शेअर आज एक दिवस आधीच्या तुलनेत 1.85 रुपयांनी कमी होऊन उघडला आणि नंतर 57.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. नोव्हेंबर 2021 मध्ये 169 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर झोमॅटोचा स्टॉक गेल्या 4-5 महिन्यांत 65 टक्क्यांनी घसरला … Read more

‘या’ रॉकेट शेअरने 2 वर्षात दिला 1100% परतावा; काय आहे यामागचं गणित?

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा त्यांच्या गुंतवणूक निर्णयांसाठी बाजारातील दिग्गजांच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतात. आशिष कचोलियाच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेले सर्व शेअर्स असे आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. Faze 3 चा स्टॉक हे याचे उदाहरण आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या दोन वर्षांत 27 रुपयांवरून 358 रुपयांपर्यंत वाढताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी … Read more

Share Market Today : सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात? कोणते शेअर्स बुडाले?

Share Market Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील (Share Market Today) घसरणीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. आठवड्यातील पाचव्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. आज सेन्सेक्स तब्ब्ल 1000 अंकांनी कोसळून 54,700 च्या खाली गेला आहे, तर निफ्टी 300 अंकांच्या घसरणीसह 16,400 च्या खाली व्यवहार करत आहे. आयटी, मेटल, रियल्टी आणि खासगी बँकांच्या … Read more

‘स्मार्ट सिटी’त औरंगाबाद देशात चौदावे 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’च्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला. या निकालात देशभरातील 75 शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद शहर देशपातळीवर चौदाव्या क्रमांकावर आहे. राज्यपातळीवर औरंगाबाद शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्मार्ट सिटी मिशनमधील या यशाने ऐतिहासिक व पर्यटन, औद्योगिक नगरी असलेल्या या शहराच्या सन्मानात … Read more