धनगर समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला धडा शिकवा – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र पाच वर्षात त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे भाजपबद्दल समाजबांधवांच्या मनात द्वेेष निर्माण झाला पाहिजे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री हे खोटारडे आहेत. ते समाजाला आरक्षण देणार नाहीत. समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला समाजबांधवांनी मतदान करू नये, देशाच्या एकात्मतेसाठी कॉंग्रेसला मतदान करावे, असे आवाहन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ धनगर मेळाव्याचे आयोजन वारणा मंगल कार्यालयात केले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला रामहरी रूपनवर, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

नाट्यरसिक उत्तम, मात्र रस्ते थर्डक्लास- प्रशांत दामले

ठाणे प्रतिनिधी। ‘कल्याणमधील नाट्यरसिक उत्तम आहेत मात्र कल्याणातील रस्ते थर्डक्लास’ अशी शाल झोडीत पोस्ट प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर केली. कारण कल्याणमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळं येथील रस्त्याच्या दुर्दशेबबाबत दामले यांनी ही पोस्ट केली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्त्यांचा उद्धार करून अवघे काही दिवसही उलटले नाहीत. … Read more

शिवसेनेकडून जिल्ह्यातील आठ विधानसभेसाठी मुलाखती

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश सुरु आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली असताना जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत पार पडल्या. मात्र या मुलाखतीसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त मुंबईतील शिवसेना भवनमध्ये समन्वयक विश्वनाथ नेरुळकर, खा. … Read more

#गणेशोत्सव २०१९ | विठ्ठल रूक्मिणी मंदिरात गुलाबी कन्हेरी फुलांची आरास

सोलापूर प्रतिनिधी | आज गणेश चतुर्थी निमित्ताने येथील सावळया विठुरायाला दुर्मिळ कन्हेरी फुलांची आरास करण्यात आली आहे. कन्हेरी फुलांच्या माळा तयार करून विठ्ठल रूक्मिणीचा गाभारा सजवण्यात आला आहे. मंदिरातील सजावटीसाठी खासकरून कर्नाटकातील बंगळुरू येथून 100 किलो गुलाबी रंगाची कन्हेरी फुले मागवण्यात आली आहेत. गुलाबी रंगाच्या कन्हेरी फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. कन्हेरीची फुलं ही … Read more

पृथ्वीराज चव्हाणां विरोधात भाजप कडून काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘जावयाला’ उमेदवारी जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात भाजपाचा उमेदवार ठरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ अतुल भोसले यांना कराड दक्षिणची उमेदवारि जाहिर केलीय. तुम्ही अतुलबाबांना आमदार करा आम्ही मंत्री करतो असा शब्द यावेळी पाटील यांनी मतदारांना दिलाय. काही दिवस थांबा पहिली … Read more

मुख्यमंत्री फडणवीस, लोणीकरांच्या भाषणातून स्वबळाने लढण्याचे संकेत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या तिन्ही सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भाषणांमधून स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वतंत्र लढते की काय अशा चर्चां सुरु झालीय. परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या चार जागा आहेत पैकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ वगळता तीन जागा युतीच्या … Read more

युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना रात्रीत अटक

कर्जत प्रतिनिधी | युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह अप्पा अनारसे व सहकारी विनोद सोनवने, सागर जाधव आणि किशोर जाधव यांना कर्जत (अहमदनगर) पोलिसांनी अटक केली असून राशीन शहराचे युक्रांद शहराध्यक्ष किरण पोटफोडे यांना भाजपच्या स्थानिक गुंडांनी मारहाण केली आहे. तसेच त्यांच्या घरावर रॉकेल ओतून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व कार्यकर्ते कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत … Read more

सोळवंडे खून प्रकरणातील टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करणार – पोलीस अधिक्षक धीरज पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील बुधवार पेठेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन दीपक सोळवंडे याच्या खुनप्रकरणी पोलिसांनी आठजणांना अटक करून त्यांना गुरूवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता आठही जणांना दि. 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयितांनी पिस्तुले कोठून आणली, खूनामध्ये वापरण्यात आलेली गाडी … Read more

महाजनादेश यात्रा ;कॅबिनेट मंत्र्याच्या आढावा बैठकीला पक्षातील आमदाराची दांडी .

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा परभणी जिल्ह्यात आली असून तर दुसरीकडे 28 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या महाजनादेश यात्रेनिमित्ताने राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हात तीन ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन ठेवले होते. गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी यापैकी पाथरी मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक भक्तीनिवास येथे ठेवण्यात आली होती. या … Read more