पुणे परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग

पुणे प्रतिनिधी। पुणे शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून गेल्या तीन तासांपासून पुणे शहर व अन्य उपनगरांमध्ये देखिल मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे शहरात अनेक भागात रस्त्यांवर पाणी वाहत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भासह मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे अंदाज असून अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात … Read more

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड

पुणे प्रतिनिधी । ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान हे साहित्य संमेलन पार पडेल. औरंगबाद येथे आज याबाबत निवड प्रक्रिया पार पडली. दिब्रिटो यांनी अनेक वर्षे विविध विषयांवर लेखन केले आहे. इंग्रजी मधील पुस्तकाचा अनुवाद केलेल्या … Read more

राज्य महिला आयोग राबविणार ‘डिजिटल साक्षरता अभियान’

मुंबई प्रतिनिधी । बचत गटांच्या महिलांसाठी प्रशिक्षणाचा ‘प्रज्ज्वला कार्यक्रम’ पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये राज्यभरात पाचशे कार्यशाळा घेतल्या जाणार असून महिलांना, विशेषतः ग्रामीण महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची सफर घडवून आणली जाणार आहे. सदर अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती देताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर म्हणाल्या, “एक … Read more

हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल भदौरिया यांची निवड

दिल्ली प्रतिनिधी । एअर मार्शल आर. के . एस भदौरिया यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी केंद्राकडून नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे २६ वे हवाई दल प्रमुख असतील. एअर मार्शल भदौरिया १५ जून १९८० मध्ये हवाई दलात दाखल झालेत. त्यांनी २६ विविध प्रकारच्या लढाऊ विमानांचे एकूण ४२५० तास उड्डाण केले आहे. त्याच प्रमाणे हवाई दलातील कमांड प्रमुख … Read more

सरकारी कामातून ‘दलित’ शब्द होणार हद्दपार

मुंबई प्रतिनिधी । अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत ‘Scheduled Caste & Nav Boudha’ आणि मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती व नव बौद्ध’ या शब्दाचा वापर करावा असा शासन निर्णय राज्य शासनातर्फे जारी करण्यात आला आहे. भारतीय संविधानाच्या कलम ३४१ अंतर्गत निर्गमत केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशांतर्गत सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, … Read more

मुख्यमंञ्याच्या एका स्वाक्षरीसाठी ३७७ राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे भवितव्य ‘पुन्हा’ एकदा टांगणीला

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेराज्यसेवा -२०१७ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची न्यायिक पद्धतीने निवड यादी जाहीर करुन देखील उमदेवारांना आता मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरी शिवाय पुढील प्रशिक्षण व नियुक्ती कार्यक्रमाची वाट पहावी लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०१७ च्या यशस्वी उमेदवारांनी त्यांच्या दीड वर्षापासून रखडलेल्या प्रशिक्षण व नियुक्तीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे … Read more

MPSC निवड रद्द झालेल्या ११८ सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदांवर नियुक्ती

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. महसूलमंत्री चंद्रकांत … Read more

पूर्वी ‘प्रदेशाध्यक्ष’ असलेल्या चित्रा वाघ यांची भाजप प्रदेश ‘उपाध्यक्ष’ पदी निवड

मुंबई प्रतिनिधी । पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांची आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेमणूक केली. महिलांसाठी केलेले कार्य, राज्यभर असलेला संपर्क यामुळे आगामी विधानसभा निवडणुकी बघता भाजप कडून त्यांच्या दीर्घ अनुभव लक्षात घेता सदर निवड करण्यात आली आहे. “आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. माझी … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचे नियुक्ती साठी ‘उपोषण’

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. याकारणास्तव अधिकारीपदी निवड झालेल्या उमेदवार पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. एप्रिल २०१७ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मे २०१८ … Read more

महाराष्ट्र आर आर आबांच्या कर्तृत्वाला कधीच विसरणार नाही – शरद पवार

सांगली प्रतिनिधी । “महाराष्ट्र आबांच्या कर्तृत्वाला कधीच विसरणार नाही. आबांनी डॉक्टरांनी दिलेले सल्ले ऐकले नाहीत आणि माझ्यासारख्या मोठ्या वयाच्या माणसाला मागे ठेवून गेले. आबा सोडून गेले याचे दुःख माझ्या मनात कायम आहे” असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तासगांव बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांचा पुतळा अनावरण सोहळा … Read more