कश्मीर कधी पाकिस्तानचे होते..? पाकिस्तान तर पहिले भारताचाच हिस्सा होता – संरक्षणमंत्री राजनाथसिंह

नवी दिल्ली प्रतिनिधी । “कश्मीर कधी पाकिस्तानचे होते..? आज जो पाकिस्तान बनला आहे , तो तर पहिले भारताचाच हिस्सा होता. आता ते राष्ट्र बनले आहे, म्हणून आम्ही त्यांच्या राष्ट्रांचा आदर करतो. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी कश्मीर बाबत काहीही विधान करावे” अशा शब्दात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला सुनावले. आज लद्दाख़ येथे संरक्षण … Read more

‘पर्यावरण पूरक व डॉल्बीडीजे मुक्त’ गणेशोत्सव साजरा करा – विश्वास नांगरे-पाटील

नाशिक प्रतिनिधी । ‘मला डीजे नको, प्रत्येक चौकात सीसीटीवी कॅमेरा हवेत’ अशा प्रबोधनपर घोषवाक्यासह नाशिक पोलीस दल यंदा भर देत आहे. नागरिकांना ‘पर्यावरण पूरक व डीजेडॉल्बी मुक्त’ गणेश उत्सव साजरा करण्याबाबत तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावण्याबाबतचे आवाहन नागरिकांना तसेच मंडळाचे सदस्य यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक शहर … Read more

नागपूर होणार विमाननिर्मिती हब – नितीन गडकरी

पीआयबी वृत्तसंस्था । नागपूरच्‍या मिहान विशेष औद्योगिक क्षेत्रामध्‍ये (सेझ) ‘टाल’ या विमान कंपनीने निर्मिती चालू केली असून, बोईंग या एयरक्राफ्ट निर्मिती करणाऱ्या कंपनीला २५,००० फ्लोर बीमचा पुरवठा करून या कंपनीने एक विक्रम स्‍थापित केला आहे. नागपूरचे एव्हिएशन मॅन्‍युफॅक्चरिंग हबचे स्‍वप्‍न यामुळे अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, … Read more

फिरोजशाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार

नवी दिल्ली प्रतिनिधी । माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची आठवण म्हणून फिरोजशाह कोटला मैदानाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेने काल जाहिर केला. देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण पदे ही भूषवली असून, त्यांची देशाला सदैव आठवण राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या एका सोहळ्यात कोटला स्टेडियमचे … Read more

काँग्रेसचा आजपासून ‘महापर्दाफाश’ सभांचा शुभारंभ

अमरावती प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आता महाराष्ट्रात कॉंग्रेसने ‘महापर्दाफाश सभा…घालवूया लबाडांचे सरकार’ असे घोषवाक्य घेवून प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. बीजेपीच्या ‘महाजनादेश’ व राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेच्या धर्तीवर आजपासून अमरावती येथून कॉंग्रेसची ‘महापर्दाफाश’ सभा सुरू होणार आहे. महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून काँग्रेस फडणवीस सरकारच्या ‘महाजनादेश’ यात्रेची ‘पोलखोल’ करणार आहे. या सभेला गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन … Read more

महिलांच्या हातात आता ‘एसटी’चे स्टेअरिंग

मुंबई प्रतिनिधी । “कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे पाऊल टाकले असून त्याचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल” असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्यावतीने १६३ महिला बस चालकांच्या प्रशिक्षणाच्या वेळी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य परिवहन … Read more

“…अशा कितीही चौकश्या करा, माझं तोंड बंद होणार नाही” – राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । “मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही” ईडी चौकशीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची काल ही प्रतिक्रिया दिली. अंमलबजावनी संचनालय (ईडी) ने सुमारे ८ तास त्यांची चौकशी केली. ‘कोहिनूर सीटीएनएल’ प्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजवला होता. त्यासंधर्भात ते काल … Read more

राज ठाकरे चौकशीला निघालेत की सत्यनारायनाच्या पुजेला…? एवढं नाटक कशासाठी? – अंजली दमानिया

मुंबई प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडी ने नोटिस बजवल्यानंतर आज राज चौकशीला सामोरे गेले. याप्रसंगी संपूर्ण परिवार ईडी च्या कार्यालयात त्यांच्या समवेत उपस्थित होता. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे हे चौकशी साठी गेलेत की सत्यनारायनाच्या पुजेसाठी गेलेत..का एवढा ड्रामा.. सगळे मिळून माहिती देणार आहेत … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस राबविणार “मुंबई बन गई खड्डे का अड्डा” अभियान

मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील खड्डयांविरोधात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने आजपासून “मुंबई बन गई खड्डे का अड्डा” आंदोलन छेडले असून रस्त्यांवरील खड्डयांचे फोटो महापालिकेला टॅग करण्याचे आवाहन मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी केले आहे. ही मोहीम जोपर्यंत मुंबईतील खड्डे बुजत नाहीत तोपर्यंत सुरूच राहणार आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन सुरू करत आहोत, यामुळे खड्ड्यांचे … Read more

पहिले राज्यस्तरीय मराठी समाज माध्यम संमेलन मुंबईत उत्साहात सुरु ; मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी । ‘समाजमाध्यम ही काळाची गरज आहे, समाजमाध्यम हे वेळकाढू पणासाठी नसून ते एक साहित्य आहे, हे फक्त फॉरवर्ड व जोक्ससाठी नसून ते एक उत्कृष्ट साहित्याचा नमुना आहे. चांगल्या, उल्लेखनीय साहित्याला राज्य शासनाच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येईल’ अशी ग्वाही मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांनी पहिल्या राज्यस्तरीय मराठी समाजमाध्यम संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.   पहिल्या राज्यस्तरीय मराठी समाजमाध्यम संमेलनाचे मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज मुंबईतीलयशवंतरावचव्हाण प्रतिष्ठानयेथेसंमेलनाचा उद्घाटन … Read more