हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या (Auto Expo 2023) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. मार्केटमध्ये सुद्धा गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक इलेक्ट्रिक गाड्या आल्या आहेत. त्यातच आता यंदा 13 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रसिद्ध वाहन निर्माता Hyundai आपली Ioniq 6 ही इलेक्ट्रिक कार प्रदर्शित करणार आहे. चला आज आपण जाणून घेऊया या गाडीचे खास वैशिष्ट्ये…
गाडीचा आकार –
Hyundai Ioniq 6 ही कंपनीच्या E-GMP आर्किटेक्चरवर आधारित असून Kona EV आणि Ioniq 5 नंतर जागतिक स्तरावर ब्रँडकडून (Auto Expo 2023) ऑफर केलेली तिसरी इलेक्ट्रिक गाडी आहे. आकाराच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या इलेक्ट्रिक मॉडेलची लांबी 4,855 मिमी, रुंदी 1,880 मिमी आणि उंची 1,495 मिमी आहे, तर याचा व्हीलबेस 2,950 मिमी आहे.
बॅटरी पॅक आणि मायलेज –
Ioniq 6 53kWh युनिट (Auto Expo 2023) आणि 77kWh युनिटसह दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे.ड्युअल मोटर सेटअप 302 bhp पॉवर आणि 605 Nm टॉर्क जनरेट करतो तर RWD सेटअप 228 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करतो. यातील 53kWh युनिट असलेल्या बॅटरी पॅकवर ही गाडी 429 किलोमीटर मायलेज देईल तर 77kWh बॅटरी सह 614 किलोमीटर रेंज मिळू शकते.
फीचर्स – (Auto Expo 2023)
गाडीच्या फीचर्स बाबत सांगायचं झालयास, Hyundai Ioniq 6 मध्ये LED हेडलॅम्प, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, कूप सारखी रूफलाइन, ADAS, एक टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, अॅम्बियंट लाइटिंग, एक फ्लॅट सेंटर कन्सोल मिळतो. तसेच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट आणि फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरएक डॅशबोर्डवर डिस्प्ले मिळतो .