धुळे प्रतिनिधी । उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शहरात सुरु असलेल्या स्कुल बस व रिक्षा,चारचाकी गाड्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे . शहरात दोन दिवसांपुर्वी कारवाई करणार अशी माहिती देण्यात आली होती. त्या नुसार शुक्रवारी सकाळीच साडेसहा वाजेच्या दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दसेरा मैदान चौकात विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या तीन ते चार रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली. यानंतर काही मिनिटांनी हे भरारी पथक चाळीसगाव रोड कनोसा हायस्कुल जवळ येऊन थांबले . तिथे हि विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनांवर आणि रिक्षावर अशा एकुण 6 ते 7 गाडी चालकांना विविध कारणे दाखवत दंडात्मक पावती देण्यात आली. कारवाई विषयी पथक माहिती देण्याबाबत टाळाटाळ करत मार्गस्थ झाले.
उपप्रादेशिक परिवहन वाहनातील चालक आणि अधिकारी यांनी स्वतःचं नियमांचे पालन केले नव्हते . त्यांनी ड्रेसवर नेम प्लेट लावलेली नव्हती. गाडीत सिट बेल्ट न लावता हे पथक दिमाखात शहरात कारवाई करत फिरत होते. रिक्षा चालक हे नियम पाळुन रिक्षा चालवत आहे. त्यांचेवर हि सुडबुध्दीने हे दंडात्मक कारवाई करण्यात येत असलेले कारवाई बंद करावी अशी मागणी रिक्षा चालक संघटनेने केली आहे .
शहरात अनेक रिक्षा आहेत ज्या परमिट संपलेले असताना रस्त्यावर धावतात. या अधिकाऱ्यांना त्या दिसत नाही का ? काही दिवसांपुर्तीच हि कारवाई केली जाते नंतर वर्षभर कोणीही फिरकत नाही , अशा संतप्त प्रतिक्रीया नागरीकांनी व्यक्त केल्या . सहा ते सात रिक्षा चालकांचे म्हणणे होते की , आम्ही मुले वाहतुक करतो . काळजी घेतो. यातुन कुटूंबाचे पालन पोषण करतो . आरटीओ विभाग नेहमीच आम्हाला लक्ष करत दंडात्मक कारवाई करतो. हि चुकीची बाब आहे. शहरात इतर रोजगार नाही .रोजगाराचा पर्याय उपलब्ध नाहीत . अशा प्रतिक्रीया रिक्षा चालकांनी दिल्या आहेत . हि जबरदस्ती कारवाई थांबली नाही तर रिक्षा चालक आंदोलन करतील असा इशार रिक्षा चालक संघटनेने दिला आहे .