औरंगाबाद | जिल्ह्यातील पैठण येथे 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संतपीठ सुरू केले जाणार आहे. हे संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत सुरू केले जाणार आहे. संतपीठ पाठपुरावा समितीच्यावतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विद्यापीठाअंतर्गत संतपीठ चालू करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
“मराठवाडा ही संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत रामदास, संत जनाबाई, संत एकनाथ यांनी महाराष्ट्राचे जनमानस घडवले. याच पार्श्वभूमीवर पैठण येथील पावन भूमीवर संतपीठाची सुरुवात केली जात आहे. संतपीठ ही मूळ सांस्कृतिक संकल्पना शिक्षनिक नाही. त्यामुळे त्याच्या मूळ संकल्पनेप्रमाणे स्वायत्त सांस्कृतिक विद्यापीठ स्थापन करण्यात यावे” अशी मागणी ज्ञानप्रकाश मोडणी यांनी केली आहे.
दरम्यान, चाळीस वर्षांपूर्वी 1981 मध्ये ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या विकासासाठी 42 कलमांची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये पैठण येथील संतपीठ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले होते.