वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली – भातखळकरांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांना उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली आहेत.” असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “बारमालकांकडून वसुली करणाऱ्या अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून हायकोर्टाने त्यांचे कायद्यापासून पळण्याचे मार्ग बंद केलेत. देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय. वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली आहेत. मुंबई हायकोर्टाने देशमुख यांनी केलेली याचिका फेटाळली आहे. मिस्टर इंडिया आता तरी प्रकट होतील अशी अपेक्षा आहे…”

अनिल देशमुखांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तर याआधी याच प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरमधील दोन परिच्छेद वगळण्यासाठी राज्य सरकारनंही याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती.

Leave a Comment