हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा स्थगित केला. मात्र, ते गेले नाहीत म्हणून त्यांच्या मनसैनिकांनी अयोध्या गाठली आहे. मनसेचे ठाण्यातील धडाडीचे नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी दाखल होताच त्यांनी रामल्लाचे दर्शन घेतल्यानंतर Facebook लाईव्ह केले आहे.
राज ठाकरे यांच्या अयोद्धेबाबतच्या दौऱ्याच्या घोषणेनंतर भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी त्याच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांना आम्ही अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांना अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला होता. मात्र, मनसेचे नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले. आणि त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले.
https://www.facebook.com/watch/?v=748608749655118
यावेळी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत म्हंटले की, आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही ठरवल्यावर कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. काहीवेळापूर्वीच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो. कोणीही मराठी माणसाला चँलेज करायचे नाही. आम्ही आलोय, आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना यांची जागा आम्ही दाखवून देऊ, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
दरम्यान, एकीकडे मनसे नेते अविनाश जाधव आपल्या कार्यकर्त्यांशी अयोध्येत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे बृजभूषण सिंह हे आपल्या समर्थकांसह अयोध्यत शक्तीप्रदर्शन करत आहेत. अशात वनद्ध जाधव यांनी थेट इशारा दिल्यानंतर याचे काही पडसाद उमटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.