SIP मध्ये होणारे नुकसान अशा प्रकारे टाळा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा लोकप्रिय मार्ग आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील धोके टाळायचे आहेत त्यांनी SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी. SIP द्वारे आपल्या सोयीनुसार नियमितपणे आपल्या आवडीच्या म्युच्युअल फंडात निश्चित रक्कम जमा करता येते. यामध्ये फंडांच्या बदलत्या नेट असेट व्हॅल्यूच्या (NAV) आधारावर गुंतवणूकीत समतोल साधून चांगले पैसे कमावते येतात.

मात्र SIP मध्ये गुंतवणूक करणे जरी फायदेशीर असले तरी कधीकधी त्यांच्याविषयीच्या अपुऱ्या माहितीमुळे गुंतवणूकदार विशेषत: नवीन गुंतवणूकदारांकडून चुका होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे बऱ्याचदा नुकसानही सोसावे लागते. चला तर मग SIP सुरु करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे समजून घेउयात…

Should You Stop or Continue Your SIP in the Current Market Scenario?

बाजारातील वाढ पाहून कधीही गुंतवणूक करू नका

जेव्हा शेअर बाजारात तेजी असते तेव्हा अनेक गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र बाजार कधी वर तर कधी खाली असतो. तसेच बाजार जितक्या वेगाने वर जातो तितक्याच वेगाने ते खालीदेखील येतो. त्यामुळे बाजाराकडे पाहून कधीही गुंतवणूक करू नये. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना नेहमीच शिस्त आणि संयमाची गरज असते. म्हणून, SIP द्वारे, एका ठराविक अंतराने कोणत्याही फंडामध्ये थोडी थोडी रक्कम गुंतवा. यामुळे आपण बाजारातील धोक्यापासून वाचू.

बाजारात घसरण झाली तरीही SIP थांबवू नका

बाजारात घसरण झाल्यावर अनेकदा गुंतवणूकदारांकडून SIP थांबवली जाते आणि बाजार सुरू झाल्यावर सुरू केली जाते. मात्र असे करणे हे धोक्याचे लक्षण आहे. यामुळे आपले नुकसानच होईल. त्यामुळे घसरत्या बाजारातही गुंतवणूक सुरू ठेवा.यावेळी गुंतवणूकीच्या कालावधीशी जुळणाऱ्या फंडाच्या श्रेणीमध्ये गुंतवणूक करावी.

गुंतवणूकीसाठी वेळ द्या

म्युच्युअल फंडामध्ये घाईघाईने गुंतवणूक करून चांगल्या रिटर्नची अपेक्षा करू नका. काही वेळा चांगला रिटर्न मिळतो तर काही वेळा कमी रिटर्न मिळतो. त्यामुळे गुंतवणूक करणे कधीही थांबवू नका. हे लक्षात घ्या कि, म्युच्युअल फंडांद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगल्या रिटर्न साठी 5 ते 7 वर्षांचा काळ गरजेचा आहे. यावरून असे दिसून आले आहे की, शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने चांगला रिटर्न मिळत आहे. त्यामुळे कमी रिटर्न मिळाला तर लगेचच पैसे काढू नका.

मध्येच SIP थांबवू नका

अनेकदा बाजारात घसरण झाल्यावर गुंतवणूकदारांकडून SIP थांबवली जाते किंवा पैसे काढले जातात. मात्र येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी कि, घसरत्या बाजारात शेअर्स देखील स्वस्त होतात. ज्यामुळे आपल्याला अगदी कमी पैशात जास्त युनिट्स मिळतात. यानंतर जसजसा बाजार वाढत जाईल तसतशी आपल्या युनिट्सची किंमत देखील वाढत जाईल. म्हणूनच, SIP मध्येच थांबवणे नुकसानीचे ठरेल.

कमी NAV म्हणजे स्वस्त फंड असे नाही

अनेक रिटेल गुंतवणूकदार NAV कमी आहे म्हणून स्वस्त फंड घेतात आणि SIP द्वारे गुंतवणूक करून जास्त रिटर्नची अपेक्षा करतात. मात्र हे लक्षात घ्या कि, फंडाची NAV जास्त किंवा कमी होण्याची अनेक कारणे असतात. फंडाची NAV ही त्याच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाखालील बाजारभावावर अवलंबून असते. तसेच चांगल्या मॅनेजर्स असलेल्या फंडाची NAV ही इतर फंडांपेक्षा वेगाने वाढते. त्याचप्रमाणे, नवीन फंडाची NAV ही जुन्या फंडापेक्षा कमी असेल कारण त्याच्या वाढीला कमी वेळ मिळाला असेल.

अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना त्यांच्या NAV कडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. गुंतवणूकदाराने कंपनीच्या मागील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Top 3 Benefits Of Systematic Investment Plan SIP In Mutual Funds

ध्येय स्पष्ट ठेवा

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपले ध्येय स्पष्ट असले पाहिजे तरच आपण योग्य फ़ंड निवडू शकाल. जर ध्येय स्पष्ट नसेल तर चुकीच्या फंडांमध्ये गुंतवणूक होण्याची शक्यता जास्त असते.

वारंवार बदल करू नका

दुसऱ्याकडे पाहून खरेदी किंवा विक्री करू नका. कारण ते हानिकारक ठरू शकते. प्रत्येकाची आर्थिक उद्दिष्टे आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे आपले ध्येय आणि पैशांनुसार गुंतवणूक सुरु करा. अनेक वेळा आपण फंडाच्या मागील कामगिरीवर आधारित गुंतवणूक करतो. मात्र इथे हे लक्षात ठेवा की, फंडाचे रिटर्न बदलत राहतात. तसेच प्रत्येक तिमाहीत फंडाचे मूल्य बदलते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sbimf.com/en-us/sip

हे पण वाचा :

Gold Investment : सोन्यामध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Multibagger Stock : ‘हे’ 5 फार्मा स्टॉक्स मल्टीबॅगर बनण्याच्या मार्गावर, 2022 मध्ये दिला आहे ‘इतका’ रिटर्न !!!

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Toyota RAV4 : TOYOTA ची RAV 4 भारतात लवकरच येणार; पहा फीचर्स आणि सर्वकाही

Leave a Comment