‘या’ नंबरवरून आलेले कॉल अजिबात उचलू नका; अन्यथा होईल आर्थिक नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केलेली आहे. आणि यामुळेच लोक अनेक गोष्टी करू शकतात. परंतु या तंत्रज्ञानाचा लोकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे. म्हणून माणसाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे. कारण टेलिफोन कंपन्यांनी AI सारखे फीचर्स लॉन्च केलेले आहेत. या AI चा वापर लोक वाईट कामासाठी जास्त करत आहेत. आणि यामुळेच फेक कॉल्स, स्कॅम मोठ्या प्रमाणात होतात. आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतो.

आजकाल अनेक फेक कॉल्स (Fake calls) आणि मेसेज येतात. या सगळ्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. परंतु आता 1 नोव्हेंबर पासून हे फेक कॉल्स आणि मेसेज कमी होणार असल्याची माहिती दिलेली आहे. या संदर्भात त्यांनी एक नवीन नियम बनवलेला आहे. या नियमामुळे आता नेटवर्क आणि मेसेजवर होणार आहे. थायलंड संचार प्राधिकरण यांच्यामध्ये थायलंडमध्ये इंटरनेट म्हणून कॉल करणाऱ्या लोकांकडे +697 आणि +688 हे दोन नंबर आहेत. अशा प्रकारचे कॉल ट्रेस करणे खूप अवघड आहे. या नंबर वरून फोन करून स्कॅमर लोकांची फसवणूक करतात. तसेच त्यांचे लोकेशन देखील मिळत नाहीत आणि त्यांना पकडणे कठीण होते.

जर तुम्हाला अशा कोणत्याही वेगळ्या नंबरवरून कॉल आला तर सहसा तो कॉल उचलू नका. परंतु जर चुकून तो कॉल उचलला, तर तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. हे लोक फोन करून म्हणतात की, ते सरकार किंवा बँकेतून फोन करत आहे आणि तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागतात. परंतु तुम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. तसेच त्यांना परत कॉल देखील करू नका.

तुमची जर अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली तर सरकारने यासाठी चक्षु पोर्टल नावाची एक नवीन वेबसाईट तयार केलेली आहे. अशावेळी तुम्ही फेक कॉल साठी मेसेजची तक्रार करू शकता. एखाद्या कॉल बाबत मनात शंका असेल, तरी देखील तुम्ही वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता. परंतु सहसा असे आलेले फोन कॉल्स किंवा मेसेजला कोणत्याही प्रकारचे उत्तर देऊ नका. अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.