वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात शिवप्रतिष्ठानची जनजागृती रॅली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्य सरकारने किराणामाल दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शविला. या निर्णयाच्या विरोधात संभाजीराव भिडे यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हि संघटना देखील रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा, तसेच दारू विक्रीवर बंदी घालावी या मागणीसाठी सांगली शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली.

या फेरीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह महिला, शेकडो धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन, निषेधाच्या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून हि फेरी काढण्यात आली. मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरवात झाली.

मारुती चौक, हरभट रोड, महापालिका, राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक, जुनी पोलीस लाईन मार्गे शिवाजी मंडई येथे या फेरीची सांगता झाली. राज्य शासनाने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा, तसेच दारूच्या आहारी जाऊन तरुण पिढी बरबाद होत असल्याने राज्यात पूर्णपणे दारू विक्रीवर बंदी घालण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आला.

Leave a Comment