हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण Axis Bank चे ग्राहक असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. जर आपण एक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असेल आणि आता आपल्याला या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल. कारण आता बँकेकडून यासाठी अनेक पर्याय दिले जात आहेत. हे लक्षात घ्या कि, आपल्या अर्जाची स्थिती ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने तपासता येईल. यासाठी आपल्याकडे एप्लिकेशन आयडी किंवा पॅन आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे ऑनलाइन आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या
आता आपल्याला घरबसल्या आपल्या क्रेडिट कार्डच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येईल. आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाइन सुद्धा अनेक प्रकारे तपासता येते. आज आपण मोबाईल नंबरद्वारे स्थिती कशी तपासावी ते जाणून घेणार आहोत.
एप्लिकेशन नंबर आणि मोबाईल क्रमांकाद्वारे
क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यानंतर एसएमएस किंवा ईमेलद्वारे एक अर्ज क्रमांक मिळतो. यांच्या मदतीने आपल्या अर्जाची स्थिती तपासता येईल. मात्र यासाठी आपल्याकडे मोबाईल नंबर देखील असावा लागेल. कारण OTP मोबाईलवरच मिळेल. आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी OTP व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा : Axis Bank
1. सर्वात आधी एक्सिस सीसी ट्रॅकर साइट उघडा https://application.axisbank.co.in/cctracker/cctracker.aspx?cta=listing-page-credit-card-cc-track-application
2. यानंतर सर्वात वर एप्लिकेशन आयडी आणि मोबाईल नंबर टाका.
3. कॅप्चा कोड एंटर करा.
4. आता “Track Now” वर क्लिक करा.
5. यानंतर मोबाईलवर OTP येईल. तो एंटर करा.
6. येथे Axis Bank क्रेडिट कार्ड अर्जाची स्थिती कळेल. Axis Bank
पॅन आणि मोबाईल नंबर द्वारे
जर आपल्याला एप्लिकेशन नंबर मिळाला नसेल किंवा काही कारणास्तव तो आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण पॅन आणि मोबाइल नंबरद्वारे देखील आपली स्थिती तपासू शकाल. यासाठी खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1. Axis CC ट्रॅकर वेबसाइटवर जा. वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा
2. या पेजवर पॅन नंबर आणि मोबाईल नंबरच्या पर्यायावर जा.
3. पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
4. पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल.
5. आता “Track Now” बटण दाबा.
6. मोबाईलवर आलेला OTP एंटर करा आणि आता स्टेट्स तपासता येईल. Axis Bank
हे पण वाचा :
आता घरबसल्या Digital Gold वर मिळेल कर्ज, त्यासाठीचे व्याजदर पहा
खुशखबर !!! Ujjawla Yojana अंतर्गत LPG सिलेंडरवरील अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवली
Bank Holiday : एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची लिस्ट
Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या
खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया