हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता Axis Bank ने देखील आपल्या काही कालावधीसाठीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.
Axis Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD साठीचे व्याजदर वाढवले आहेत. 16 जुलै 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. बँकेने 7 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मात्र 6 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे. त्याच वेळी, 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मात्र 8 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. आता नवीन व्याजदर 4.40 टक्क्यांऐवजी 4.65 टक्के असेल. इथे हे लक्षात घ्या कि, उर्वरित आणि कोणत्याही कालावधीसाठीच्या FD चे व्याजदर आधीप्रमाणेच राहतील. Axis Bank
अलीकडेच एसबीआय, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी देखील आपल्या FD वरील दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकाकडून हे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. Axis Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
IRCTC : सावधान !!! रिफंडच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून केली जात आहे फसवणूक
YES Bank च्या ग्राहकांना मुदतीआधी FD बंद केल्यास द्यावा लागणार जास्त दंड !!!
PM Kisan च्या KYC सहित 31 जुलैपर्यंत पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे !!!
SBI ग्राहकांसाठी खुशखबर, आता FD वर मिळणार जास्त व्याज !!!
BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स