हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । axis bank कडून नुकतेच आपल्या FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. 13 जूनपासून FD वरील नवीन दर नवीन लागू झाले आहेत, तर 1 जूनपासून बचत खात्यावरील व्याजदर बदलले आहेत. सर्व बदल हे 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर लागू होणार आहेत.
यानंतर आता axis bank कडून 7 ते 10 वर्षांच्या FD वर 2.5 टक्के ते 5.75 टक्के व्याज मिळेल. तर बचत खात्यावर 3 ते 3.50 टक्के व्याज मिळेल.
FD वरील व्याज असे असतील …
axis bank कडून 7 ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के तर 30 दिवस आणि 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 3 टक्के व्याज दिला जात आहे. तसेच बँक 3 ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 6 ते 9 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के, 9 महिने ते 1 वर्षाच्या एफडीवर 4.75 टक्के आणि 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या एफडीवर 5.25 टक्के व्याज देत आहे.
त्याचबरोबर बँकेकडून 15 महिने ते 2 वर्षांच्या एफडीवर 5.30 टक्के, 2 ते 5 वर्षांच्या एफडीवर 5.60 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज देत आहे. यासह ज्येष्ठ नागरिकांना 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज मिळत आहे.
बचत खात्यावरील व्याज असे असतील …
axis bank कडून 50 लाख रुपयांपेक्षा कमी बचत खात्यावर 3 टक्के व्याज देत आहे. यानंतर बँकेकडून 800 कोटी रुपयांपेक्षा कमी बचत खात्यावर 3.50 टक्के व्याज दर मिळत आहे. इथे हे लक्षात घ्या कि, बचत खात्यावरील हे व्याज दर वार्षिक आधारावर उपलब्ध असेल.
SBI ने देखील एफडीवरील व्याजदरात केला बदल
बँकेने 14 जूनपासून म्हणजेच आजपासून व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. SBI ने 211 दिवस ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदरात 15-20 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. तरी. 211 दिवसांपेक्षा कमी आणि 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD च्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इथे हे लक्षात ठेवा कि, SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिला जात आहे. बँक आता किमान 2.90 टक्के तर जास्तीत जास्त 5.50 टक्के (ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त) व्याज देत आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!
Multibagger Stock : ‘या’ शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 2000% रिटर्न !!!
FD Rate : SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँकेने FD वरील व्याजदर वाढवले
Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा