Ayodhya Masjid : राम मंदिर उभारलं, मग मशीद का रखडली??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ayodhya Masjid। आजचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे . कारण आज अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) पार पडणार आहे. देशभरातून ८००० पेक्षा अधिक दिग्गजांसह लाखो रामभक्त या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले असुंन भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी चांगलीच सजली आहे. परंतु एकीकडे अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं असलं तरी मशिदीचे काम अजूनही का रखडलं आहे असा प्रश्न काहींच्या मनात नक्कीच आला असेल .

अनेक वर्षाच्या सुनावणीनंतर अखेर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात बाबरी मशिदीची वादग्रस्त जमीन एका ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, असे म्हटले होते. या जमिनीवर राम मंदिर बांधन्यात यावं आणि मशिदीसाठी उत्तर प्रदेश सेंट्रल सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. यानंतर उत्तरप्रदेश सरकारने अयोध्येपासून 25 किमी अंतरावर असलेल्या धन्नीपूर गावात मशिदीसाठी (Ayodhya Masjid) 5 एकर जमीन दिली, मात्र अजूनही ती जमीन मोकळीच पडून आहे. तर दुसरीकडे राम मंदिर उभारून त्याचे उदघाटन सुद्धा आज पार पडणार आहे.

‘मशीद बांधण्याची जबाबदारी कोणाची?? Ayodhya Masjid

‘मशीद बांधण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाची’ आहे. बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणात पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी मशिदीचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे चांगलेच संतापलेले दिसत आहे. मशिदीसाठी वक्फ बोर्डाला जमीन मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी काम सुरू करायला हवे होते, मात्र अजूनही याठिकाणी कसलंही काम सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे देशातील मुस्लिमांनी सुद्धा मशिदीचे काम (Ayodhya Masjid) सुरु न झाल्याबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

का रखडलं मशिदीचे काम??

दरम्यान, इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अतहर हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, मशिदीचे बांधकाम सुरू न करण्यात सर्वात मोठी अडचण ठरत आहे ती म्हणजे पैशाची. त्यांच्या मते जितक्या पैशाची गरज होती तितका पैसा अजून गोळा झालेला नाही. सदर प्रस्तावित मशिदीसह, एक हॉस्पिटल, एक कम्युनिटी कॅन्टीन बांधण्याची योजना आहे. या नव्याने उभारण्यात येणाऱ्या मशिदीत ५००० महिला आणि ४००० पुरुष एकत्र नमाज अदा करू शकतील. मशिदीतील 5 मिनार इस्लामच्या पाच स्तंभांचे प्रतिनिधित्व करतील. असे म्हंटल जात आहे कि, अयोध्येची मशीद ताजमहालापेक्षाही सुंदर असेल.