हैद्राबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ओवेसी यांनी बाबरी मशिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असं म्हटलं आहे. आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ओवेसींनी सकाळीच ट्विटवरुन बाबरीचे दोन फोटो ट्विट केले आहेत.
“बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार इन्शाअल्लाह”, असं ट्विट ओवेसींनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाबरीच्या एका जुन्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोबरोबरच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीची वास्तू पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनादरम्यानचाही फोटो ट्विट केला आहे. ओवेसी यांनी #BabriZindaHai हा हॅशटॅग वापरल्यानंतर तो टॉप ट्रेण्डमध्ये आला आहे. अनेकांनी बाबरीसंदर्भातील ट्विट केलं असून ओवेसींचे ट्विटही चांगलेच व्हायरल झाल्याचे पहायाला मिळत आहे.
#BabriMasjid thi, hai aur rahegi inshallah #BabriZindaHai pic.twitter.com/RIhWyUjcYT
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 5, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”