नागपूर प्रतिनिधी | राममंदिराचा मुद्दा चांगलाच पेटला असून हिंदुत्ववादी संघटनांनी राममंदिराची मागणी चांगलीच जोर लावून धरली आहे. एकीकडे विश्व हिंदू परिषद राममंदिर निर्माणासाठी संकल्प केला आहे. तर दुसरीकडे राममंदिर निर्माणात होत असलेल्या निर्णयावरून संत नाराज झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभुमीवर योग गुरु रामदेव बाबा यांनी मोठे विधान केले आहे.
राम कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून तो संपूर्ण भारत देशाचा आहे. तेव्हा राममंदिराच्या उद्धारासाठी सर्व संतांनी एकत्र यावे असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. संतांमधेच एकी नसल्याने देशात त्याचा चुकीचा संदेश जात असून यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. असेही रामदेव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी अयोध्येच्या दिशेने राममंदिराच्या उभारणीकरता मार्च निघणार असून त्यात ९९% साधू संत सहभागी होतील अशी माहीती रामदेव यांनी दिली. तसेच यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असा इशारा बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.