Thursday, October 6, 2022

Buy now

RBI च्या निर्णयाचा Paytm वर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

मुंबई I One97 Communications म्हणजेच पेटीएमचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. शेअरच्या किंमतीत मोठी घसरण, व्यवसाय वाढीचा कमी अंदाज यांसारख्या अनेक समस्यांना तोंड देत असलेल्या कंपनीला आता RBI नेही मोठा झटका दिला आहे. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक बनवण्यास मनाई केली आहे.

11 मार्च रोजी, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली. यासोबतच RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेचे आयटी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या आयटी ऑडिटचा अर्थ असा आहे की, कंपनीचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच सॉफ्टवेअर अनेक ग्राहकांचा भार उचलण्यास सक्षम आहे का ? त्यात काय त्रुटी आहेत का ? आणि असतील तर त्या का येत आहेत ? या सर्व बाबी तपासल्या जातील.

यानंतर, मॅक्वेरीने One97 Communications बद्दल आपला रिपोर्ट जारी केला आहे. One97 Communications ही पेटीएम पेमेंट्स बँकेची मूळ कंपनी आहे. मॅक्वेरीने आपल्या रिपोर्ट मध्ये काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात.

व्यवसायावर किती परिणाम होईल ?
RBI च्या या निर्णयाचा पेटीएमच्या व्यवसायावर फारसा परिणाम होणार नसल्याचे मॅक्वेरी यांनी म्हटले आहे. पेटीएम ही देशातील सर्वात मोठी फिनटेक कंपन्यांपैकी एक आहे. पेटीएम गेल्या वर्षी शेअर बाजारात लिस्ट झाली होती. मॅक्वेरी यांनी म्हटले आहे की, RBI च्या या निर्णयामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेला छोट्या फायनान्स बँकेत रूपांतरित करण्याचे प्रयत्न बाजूला पडू शकतात.

ब्रँडवर परिणाम
या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे की, “आम्ही RBI च्या या निर्णयाचा पेटीएमच्या व्यवसायावर फारसा परिणाम होण्याची अपेक्षा करत नाही. याचे कारण म्हणजे पेटीएमने आधीच आपल्या पेमेंट बँकेसाठी मोठा ग्राहकवर्ग तयार केला आहे. मात्र, पेटीएम ब्रँडवर याचा परिणाम होईल अशी आमची अपेक्षा आहे. पुढे जाऊन ग्राहकांच्या निष्ठेवरही परिणाम होऊ शकेल.”

लायसन्स मिळण्यात अडचण
इंडस्ट्री मधील सूत्रांनी देखील मॅक्वेरीच्या मताचे समर्थन केले. ते म्हणाले, “व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही, कारण ट्रान्सझॅक्शनचे मूल्य नवीन ग्राहकांवर अवलंबून नाही. मात्र, RBI चे हे पाऊल वाईट वेळी आले आहे, कारण ते पेटीएमवर RBI चा विश्वास कमी असल्याचे दर्शवते. हे अशा वेळी आले आहे जेव्हा पेटीएम RBI कडून बँकिंग लायसन्स मागणार आहे.”

मॅक्वेरी म्हणाले की,”नवीन घडामोडींमुळे पेटीएम पेमेंट्स बँकेचे स्वतःला लहान फायनान्स बँकेत रूपांतरित करण्याची शक्यता कमी झाली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेने या वर्षी मार्चमध्ये RBI कडे बँकिंग लायसन्स साठी अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. मनीकंट्रोलने ९ मार्च रोजी याबाबत माहिती दिली होती.”

UPI मध्ये मार्केट शेअर
पेटीएम पेमेंट्स बँक पेटीएमशी संबंधित सर्व प्रकारची उत्पादने ऑफर करते. यामध्ये UPI चाही समावेश आहे. पेटीएमचा UPI मार्केटमध्ये 16 टक्के वाटा आहे. पेटीएम वॉलेटमध्ये 33 कोटींहून जास्त अकाउंट्स आहेत. रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेचे नवीन ग्राहक तयार करण्यावर बंदी म्हणजे एक प्रकारे पेटीएमचे नवीन ग्राहक तयार करण्यावर बंदी.