अजितदादांना मोठा धक्का!! बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; लवकरच पक्षप्रवेश होणार

ajit pawar sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी रात्री शरद पवारांची भेट घेतली आहे. यापूर्वी बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासूनच बाबाजानी दुराणी शरद पवार (Sharad Pawar) गटात जाणार अशा चर्चा सुरु झाल्या. आता शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर खुद्द बाबाजानी दुर्राणी यांनीच आपण पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय.

काल परवाच बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाले आणि तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागलं. यानंतर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा चर्चानी जोर धरला. एकीकडे या चर्चा सुरु असतानाच आता खुद्द बाबाजानी दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवारांची भेट घेतल्याने त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सुद्धा बाबाजानी दुर्रानी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

मी शरद पवारांच्या नेतृत्वात भविष्यात काम करणार आहे. मी सुरुवातीपासून 1985 पासून शरद पवारांच्यासोबत आहे. मध्यंतरी थोडं आठ-दहा महिन्यांचं डायव्हर्जन झालं. मात्र समविचारी पक्षांसोबत काम करणं सोप्प जाते असं बाबाजानी दुराणी यांनी म्हंटल. अजित पवार सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानेच काम करतात. पण त्या ठिकाणी दोन्ही बाजूने जे पक्ष आहेत. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अल्पसंख्यांक विचाराच्या कार्यकर्त्याच विटंबना होत असल्यासही दुर्राणी म्हणाले. ज्याठिकाणी कार्यकर्ते, नेता आणि मतदारांमध्ये मतभेद होतात तिथे काम करणं कार्यकर्ते आणि नेत्यालाही कठीण होऊन बसतं असं मत दुर्राणी यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत आले होते. त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपली आहे. पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं. पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळेच ते नाराज असल्याची माहिती आहे.