औरंगाबाद : कोरोनामुळे मागील वर्षी सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने आर्थिक अडचणींना कलावंतांना तोंड द्यावे लागले. त्यातच लॉकडाऊननंतर आता कुठे कार्यक्रम सुरू झाले होते, मात्र त्यातही आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने सर्व लग्न समारंभ, सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने लोककलावंतांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.
एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते संकट त्यामुळे अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असले तरी अनेक व्यवसाय आता पूर्व पदावर येत आहेत. मात्र लग्नसमारंभ, सामूहिक पध्दतीने होणारे विविध कार्यक्रम, जागरण गोंधळाचा कार्यक्रम असो किंवा अन्य इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम असो ते पूर्णतः रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या लग्नसराई दिवस असून, यातील कुलदैवताचा कुळाचार गोंधळ, जागरण अविभाज्य भाग मानला जातो. प्रथेपरंपरेनुसार चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सध्या कोरानाने ‘गोंधळ’ घातल्यामुळे सर्वाधिक फटका गोंधळ, जागरण करणार्या कलाकारांना बसला आहे.
कुलदैवतेचा कुळाचार व देवीचा गोंधळ जागरण करून लग्नसराईला सुरूवात होते. परंतु यावर्षी धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने गोंधळ कार्यक्रम आता बंद ठेवावे लागले आहे. ११ मार्चपर्यंत कार्यक्रमांना परवानगी होती. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे लोककलावंतांवर उपासमारीची पुन्हा वेळ ओढवली आहे.
पुन्हा ओढवले संकट; शाहीर धुमाळ
आता कुठे थोड्या प्रमाणात कार्यक्रम सुरू झाले होते. पण जिल्ह्यात अंशत: लाॅकडाऊन असल्याने लोककलावंतांवर संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे कलाकारांना पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
शासनाच्या आदेशानुसार आता लग्न सराईत होणारे धार्मिक कार्यक्रम बंद झाले असल्यामुळे महाराष्ट्रातील बर्याच लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुन्हा कोरोनामुळे जागरण गोंधळ कार्यक्रम बंद झाले आहे. त्यामुळे पुन्हा आर्थिक संकट ओढवले असल्याची खंत लोककलावंत शाहीर सुमित धुमाळ यांनी व्यक्त केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा