त्यांची फक्त दाढी वाढली, पण स्क्रू ढीला झालाय; ममतादीदींचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशाच्या केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याना भाजपचे कडवे आव्हान असून खर तर ममता दीदी आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची दाढी वाढते आहे. कधी ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवून घेतात, तर कधी स्टेडियमला स्वत:चं नाव देतात. त्यांच्या डोक्यात काहीतरी बिघाड झाला आहे. त्यांचा स्क्रू ढिला झालाय असं वाटतंय”, अशी बोचरी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये प्रथमच निवडणुकीत रंगतदार अवस्था निर्माण झाली असून संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांनी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like