प्रतिनिधी कराड ।सकलेन मुलाणी
कराड :-जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कराड नगरीचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती बादशाहभाई अल्ली मुल्ला यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याकरिता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बादशाहभाई यांच्या भाजी मंडई परिसरातील घरी भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, युवानेते इंद्रजीत चव्हाण, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, नुरुल बादशाह मुल्ला, साबीर मुल्ला, वसिम सय्यद, उस्मान गणी मुल्ला, नितीन ओसवाल आदी यावेळी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या बाद्शाहभाई यांनी गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता. त्यांनी आयुष्यभर आपली तत्वे जपत जीवन व्यतीत केले हे त्यांच्या राजकीय जीवनात सुद्धा अनुभवाला मिळाले. मुस्लिम समाजाचे नेतृत्व करीत ते समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम अग्रेसर असायचे.
राजकीय जीवनात कार्यरत असताना कोणत्याही पदाची-सत्तेची अपेक्षा न ठेवता फक्त जनतेसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. सलग तीन वेळा त्यांनी भाजी मंडई परिसरातून कराड नगरपरिषदेसाठी प्रतिनिधित्व केले होते आणि २ वेळा त्यांनी बांधकाम सभापती पद यशस्वीपणे सांभाळले असले तरी त्यांचे राहणीमान शेवटपर्यंत अत्यंत साधे होते. बादशाहभाईंनी आयुष्यभर जी तत्वे व विचार जपले त्याचे आयुष्यभर सर्वांनी पालन केले तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही प्रतिपादन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा