Bajaj Finance ने FD व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यामध्ये आता फायनान्स कंपन्या देखील सामील होत आहेत. यादरम्यानच, आता बजाज फायनान्सने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.

Bajaj Finance share price tanks 5% despite in-line Q4 results; should you buy, hold or sell? What analysts say | The Financial Express

7 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

Bajaj Finance ने आता 5 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता बजाज फायनान्सकडून 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना 44 महिन्यांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज दर मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 7.75 टक्के व्याज मिळेल. 7 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू झाले आहेत.

Independence Day Special FD Scheme Launched By SBI Bank Of Baroda And Axis Bank With Higher Interest Rates | Independence Day Special FD Scheme: आजादी के अमृत महोत्सव पर इन बैंकों ने

एफडीवरील नवीन दर

Bajaj Finance कडून 15 महिन्यांच्या एफडीवर 6.70 टक्के, 18 महिन्यांच्या एफडीवर 6.80 टक्के, 22 महिन्यांच्या एफडीवर 7.05 टक्के, 30 महिन्यांच्या एफडीवर 7.35 टक्के, 30 महिन्यांच्या एफडीवर 7.35 टक्के आणि 44 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के व्याज दिले जात आहे.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये (FD Rates) वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Bajaj Finance

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bajaj Finance

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.bajajfinserv.in/fixed-deposit-fees-and-interest-rates

हे पण वाचा :
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!