Devendra fadnavis : धनुष्यबाण गोठवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची हसत हसत प्रतिक्रिया; म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । Devendra fadnavis :शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये एकाच नाराजीची लाट उसळली आहे. या सर्व काटकारस्थानामागे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता खुद्द फडणवीस यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) हसत हसत दिलेल्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना आज एका पत्रकाराने, ‘वडिलांनी आयुष्यभर कमावलं ते मुलानं एका मिनिटांत घालवलं असं एकनाथ खडसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रश्न विचारला. यावर फडणवीस यांनी हसत हसत आता मी यावर काय बोलू अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. यांनतर पत्रकारांनी आज उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधणार आहेत, तुम्ही ठाकरेंना ऐकणार आहेत काय असा प्रश्न केला असता फडणवीसांनी पुन्हा गालातल्या गालात हसत आज मला खूप कामं आहेत असे म्हटले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/3295545610684116

हे पण वाचा :
शरद पवार हे राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल, शिवसेना संपवायला तेच जबाबदार
धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात, दिघे असते तर शिंदेंना उलट टांगलं असत
शिवसेनेचं नवं चिन्ह कोणतं?? नार्वेकरांचे सूचक ट्विट
संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांच नाव ही संपलं; मनसेने उद्धव ठाकरेंना डिवचलं
शिवसेनेला मोठा झटका! धनुष्यबाण गोठवलं, पक्षाचे नावसुद्धा वापरता येणार नाही