हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Bajaj Finance ने 15 हजार ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
22 डिसेंबरपासून पासून नवीन दर लागू
DCB Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 22 डिसेंबरपासून 2022 पासून लागू आहेत. आता बँकेकडून सामान्य नागरिकांना 15 महिन्यांच्या एफडीवर 7.20 टक्के, 18 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के, 22 महिन्यांच्या एफडीवर 7.35 टक्के, 30 महिन्यांच्या एफडीवर 7.30 टक्के, 33 महिन्यांच्या एफडीवर 7.30 टक्के, 39 महिन्यांच्या एफडीवर 7.60 टक्के, 44 महिन्यांच्या एफडीवर 7.70 टक्के व्याजदर दिला जाईल. FD Rates
वेगवेगळ्या कालावधीसाठीचे व्याजदर
हा एक कम्युलेटिव्ह व्याज दर आहे म्हणजेच याचा अर्थ असा की, आता मुदतीनंतर सर्व व्याज एकाच वेळी दिले जाईल. याशिवाय 12-23 महिन्यांच्या एफडीवर 7.05 टक्के, 24 महिन्यांच्या एफडीवर 7.50 टक्के, 25-35 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के आणि 36-60 महिन्यांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याजदर दिला जातो आहे. FD Rates
त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना 15 महिन्यांच्या एफडीवर 7.45%, 18 महिन्यांच्या एफडीवर 7.50%, 22 महिन्यांच्या एफडीवर 7.60%, 30 महिन्यांच्या एफडीवर 7.55%, 33 महिन्यांच्या एफडीवर 7.55%, 39 महिने आणि 44 महिन्यांच्या एफडीवर 7.85% टक्के व्याज दिले जात आहे. याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना 12-23 महिन्यांच्याच्या एफडीवर 7.30 टक्के, 24 महिन्यांच्या एफडीवर 7.75 टक्के, 25-35 महिन्यांच्या एफडीवर 7.50 टक्के आणि 36-60 महिन्यांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज मिळेल. FD Rates
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. DCB Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/fixed-deposit-fees-and-interest-rates
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये