हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक आणि खाजगी बँकांव्यतिरिक्त, अनेक नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांनी (NBFC) देखील त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आता Bajaj Finance ने देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे
20 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
Bajaj Finance च्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवीन दर 20 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर, बजाज फायनान्स एफडीवर जास्तीत जास्त 8.10 टक्के व्याज देत आहे. त्याच प्रमाणे या कंपनी कडून 44 महिन्यांची स्पेशल FD स्कीम देखील चालवली जात आहे, ज्यावर 8.1 टक्के व्याज मिळत आहे. एफडीच्या इतर श्रेणींमध्ये सर्वाधिक 7.85 टक्के व्याजदर मिळत आहे.
Bajaj Finance च्या एफडीचे नवीन दर
याशिवाय Bajaj Finance 39 महिन्यांची स्पेशल एफडी देखील देत आहे. या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के व्याज मिळत आहे, तर सर्वसामान्यांना सर्वाधिक 7.60 टक्के व्याज एफडीवर दिले जात आहे. त्याच बरोबर कंपनी 15 महिने, 18 महिने, 22 महिने, 30 महिने, 39 महिने आणि 44 महिन्यांच्या स्पेशल एफडी देखील ऑफर करत आहे.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/fixed-deposit
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये