हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता बजाज फायनान्सने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे.
Bajaj Finance कडून 15,000 ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. 12 ते 23 महिने, 15 महिने, 18 महिने आणि 22 महिन्यांच्या कालावधीसाठी हे दर वाढवण्यात आले आहेत. बँकेकडून 12-23 महिन्यांच्या कालावधीसाठी आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांसाठीचा व्याज दर वार्षिक 6.20 टक्क्यांवरून 6.35 टक्के करण्यात आला आहे. त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दर वार्षिक 6.45% वरून 6.60% पर्यंत वाढवले आहेत. 26 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांसाठी 22 महिन्यांच्या कालावधीसाठी दर वार्षिक 6.65% वरून 6.80% पर्यंत वाढवण्यात आला आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 6.90% वरून 7.05% पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच आता गुंतवणूकदारांना वार्षिक 7.75% पर्यंत जास्त व्याजदर मिळेल. Bajaj Finance
हे लक्षात घ्या की, अलीकडेच RBI कडून रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करून 5.4 टक्के केला गेला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. Bajaj Finance
अलीकडेच एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक इत्यादी बँकांनी देखील आपल्या FD वरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकां कडून दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली. Bajaj Finance
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/fixed-deposit-fees-and-interest-rates
हे पण वाचा :
HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
Stock Market : Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!
Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!
Multibagger Stocks : ‘या’ 5 कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना पुढील महिन्यात मिळणार बोनस शेअर्स !!!
Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी !!!