हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांना नोकरीची संधी आहे. बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – बाल विकास प्रकल्प (महाराष्ट्र शासन)
पद संख्या – 38 पदे
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
मराठी भाषा (उमेदवाराने इयत्ता 10 वी मराठी भाषासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)
उमेदवार 12 वी पास, पदवी, पदव्युत्तर, D. Ed. B. Ed आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक.
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे
असा करा अर्ज –
सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन झाल्यावर ते पूर्ण वाचून घ्या.
अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (Bal Vikas Prakalp Bharti 2023)
दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय 117, पहिला मजला, बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई – 18
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
अधिकृत वेबसाईट – https://mumbaicity.gov.in/