बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; सत्तास्थापनेच्या दृष्टीने खलबत सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचले आहेत. आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने थोरात पवार भेटीला अधिक महत्व प्राप्त झालंय.

भाजप सेनेच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच शिवसेनेने आम्हाला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला तर आम्ही वेगळा विचार करू, असं थोरात यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यामुळे थोरातांच्या बारामती दौऱ्याला विशेष महत्व आहे. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांचा कल जाणून घेण्यासाठी एका विशेष बैठकीचं आयोजन केलं आहे.

त्यामुळे आज शिवसेनेची बैठक आणि थोरात यांनी पवारांची भेट घेणं या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, पवार-थोरात यांच्या भेटीत नेमकं काय समोर येतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे तसेच कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित होते.